मुंबईमधील चर्चगेटमधल्या वसतिगृहातील प्रकरणाबाबत मोठी अपडेट
VIDEO | मुंबईमधील शासकीय वसतीगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला किती मिळाली मदत? काय आहे मोठी अपडेट
मुंबई : मुंबईमधील चर्चगेटमधल्या वसतिगृहातील प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईमधील शासकीय वसतीगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला ५ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातील अधीक्षकाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला असून या शासकीय वसतिगृहातील अधीक्षिकेचे निलंबन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आरोपी ओमप्रकाश कनोजिया पाण्याच्या पाईपलाईनच्या मदतीने पहिल्या मजल्यावर चढला होता. वसतिगृहाचे गेट बंद झाल्याने आरोपी पाण्याच्या पाईपलाईनच्या मदतीने पहिल्या मजल्यावर चढला होता. पहिल्या मजल्यावरून आरोपी पायऱ्यांवरून चौथ्या मजल्यावर गेला, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली होती. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी वसतीगृह प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. पीडितेने वसतिगृहाच्या वॉर्डन मॅडमला आरोपीची तक्रार केली होती. पण त्यांनी लक्ष दिलं नाही, असा आरोप पीडितेच्या आई-वडिलांचा होता. तसेच पीडित मुलीला वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीला का ठेवलं? असा सवाल पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू होता.