Special Report | लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींकडून 5 संकल्पाची घोषणा
भ्रष्टाचाराविरोधात आणखी कठोर लढाई लढण्याचे संकेत मोदींनी दिलेत आणि परिवारवादावरुन गांधी कुटुंबावरही नाव न घेता निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या लाल किल्यावरच्या भाषणानंतर, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीही पलटवार केलाय.
नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवताना, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरुन हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराविरोधात आणखी कठोर लढाई लढण्याचे संकेत मोदींनी दिलेत आणि परिवारवादावरुन गांधी कुटुंबावरही नाव न घेता निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या लाल किल्यावरच्या भाषणानंतर, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीही पलटवार केलाय. आम्ही गेल्या 75 वर्षात अनेक मोठी उद्दिष्टे गाठली आहेत. प्रत्येक भारतीयांच्या कष्टामुळेच हे साध्य झालं म्हणूनच आपण विकासात मोठी झेप घेतली आहे. मात्र, हे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि गौरवशाली यशाला तुच्छ लेखण्याचं काम करत आहे. हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही. राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक गोष्टींची मोडतोड केली जात आहे. गांधी, नेहरु आणि पटेल आणि स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही हे प्रयत्न मोडून काढू. आम्ही त्याचा जोरदार विरोध करु, असे सोनियां गांधींनी म्हटले आहे.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन

भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....

मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल

भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
