एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ‘हे’ ५ ठराव मांडले जाणार, कोणते ते बघा?
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कोण-कोणते ठराव मांडण्यात येणार?
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पाच ठराव मांडले जाणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने अभिनंदनाचा ठराव होणार, सहा महिन्यातील कामाचा आढावा घेणारा अभिनंदनाचा ठराव, पक्ष वाढीसाठी कोणत्या प्रकारे काम करायचे याची रणनिती सांगणारा ठराव मांडला जाणार तर या बैठकीत कार्यकारिणीच्या मुख्यनेत्यासंदर्भातदेखील ठराव होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आज २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ही बैठक मुंबईतील ताज प्रेसेंडेंट येथे संपन्न होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी ,खासदार,आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Feb 21, 2023 08:22 PM
Latest Videos