नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी यांच्या लढाईत कोणाची बाजी? ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो?

नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी यांच्या लढाईत कोणाची बाजी? ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो?

| Updated on: Dec 01, 2023 | 12:44 PM

पाच राज्यातील निकालाचा कौल घेणाऱ्या एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. यानुसार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी टेन्शन वाढवणारा कौल समोर आलाय. TV9 पॉलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, ५ राज्याच्या निवडणुकीत भाजपला झटका तर काँग्रेसने जोरदार मुसंडी

मुंबई, १ डिसेंबर २०२३ : लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालंय. या निवडणुकीचा निकाल येत्या रविवारी लागणार आहे. मात्र त्याआधी निकालाचा कौल घेणाऱ्या एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. यानुसार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी टेन्शन वाढवणारा कौल समोर आलाय. TV9 पॉलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, ५ राज्याच्या निवडणुकीत भाजपला झटका तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम आणि राजस्थान येथे विशेषतः मोदी आणि भाजपसाठी चिंताजनक निकाल लागू शकतात, असे एक्झिट पोलचे आकडे सांगतात. या एक्झिटपोलनुसार, मध्यप्रदेशात भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांचं सरकार जातंय तर काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येतंय.

Published on: Dec 01, 2023 12:44 PM