ST स्टँड आहे की एअरपोर्ट….अजितदादांच्या संकल्पनेतून ‘इतक्या’ कोटींचं कुठं उभारलंय भव्य-दिव्य बस स्थानक?
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून तब्बल 50 कोटींचे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात आले आहे. असं बस स्थानक तुम्ही कधी पाहिलंच नसेल असं बारामतीत उभारण्यात आलेल्या बस स्थानकाचं रूपडं असणार आहे. कधी होणार लोकार्पण?
बारामती, २८ फेब्रुवारी २०२४ : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून तब्बल 50 कोटींचे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात आले आहे. असं बस स्थानक तुम्ही कधी पाहिलंच नसेल असं बारामतीत उभारण्यात आलेल्या बस स्थानकाचं रूपडं असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मार्चला लोकार्पण होणार आहे. बारामती शहरात अत्याधुनिक आणि सुसज्ज तसेच विमानतळाच्या आकाराचे भव्य असे बस स्थानक उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे बारामतीसह राज्यभरात राज्य परिवहन महामंडळाच्या या बसस्थानकाची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून जवळपास 50 कोटी रुपये खर्च करत या बस स्थानकाची उभारणी करण्यात आलेली आहे. हे बस स्थानक जवळपास सहा एकरामध्ये उभारलेले असून यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी अनेक सुख सुविधा देण्यात आलेल्या आहेत. बघा व्हिडीओ आणखी काय काय सुविधा प्रवाशांना पुरवण्यात आल्यात…