Supriya Sule Suspension : संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतून निलंबन
लोकसभेत गोंधळ करणाऱ्या काही विरोधी खासदारांचं संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबन करण्यात आले आहे. मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह आणखी ५० विरोधी सदस्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले.
नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२३ : एकीकडे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे लोकसभेच्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच या अधिवेशनातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभेत गोंधळ करणाऱ्या काही विरोधी खासदारांचं संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
Published on: Dec 19, 2023 01:01 PM
Latest Videos