50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 7 August 2021

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 7 August 2021

| Updated on: Aug 07, 2021 | 3:24 PM

राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार? हा प्रश्न अनिर्णित आहे. त्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मोठं विधान केलं आहे.

राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार? हा प्रश्न अनिर्णित आहे. त्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मोठं विधान केलं आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकल सुरू होण्याच्या मुंबईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.