50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 September 2021

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 September 2021

| Updated on: Sep 01, 2021 | 3:41 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) हे आज ठाणे (Thane) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) हे आज ठाणे (Thane) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.  सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.

तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.