50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2:30 PM | 14 August 2021

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2:30 PM | 14 August 2021

| Updated on: Aug 14, 2021 | 3:07 PM

मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम आणि निष्कलंक मंत्री म्हणून लौकिक असलेल्या नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्थानिक नेते राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे आणत असल्याचा थेट आरोप केला आहे.

मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम आणि निष्कलंक मंत्री म्हणून लौकिक असलेल्या नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्थानिक नेते राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे आणत असल्याचा थेट आरोप केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडले जात आहे. अधिकारी किंवा कंत्राटदारांनी त्यांना न जुमानल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत लोकप्रतिनिधींची मजल गेल्याचे नितीन गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.