50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2:30 PM | 18 August 2021
मागील अनेक दशकांपासून युद्धांमुळे अफगाणिस्तानमधील हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. ब्रिटिशांपासून सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेपर्यंत अनेक महासत्तांनी अफगाणिस्तानमध्ये आपलं सैन्य उतरवलं, तर पाकिस्तान, चीनसह अनेक देश इतरांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन अफगाणमधील परिस्थितीचा फायदा घेत आहेत.
मागील अनेक दशकांपासून युद्धांमुळे अफगाणिस्तानमधील हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. ब्रिटिशांपासून सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेपर्यंत अनेक महासत्तांनी अफगाणिस्तानमध्ये आपलं सैन्य उतरवलं, तर पाकिस्तान, चीनसह अनेक देश इतरांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन अफगाणमधील परिस्थितीचा फायदा घेत आहेत. मात्र, या सर्वांच्या या प्रयत्नांमागे अफगाणिस्तानमधील एक खजाना असल्याची चर्चा आहे. या खजान्याची किंमत अमेरिकेच्या अभ्यासानुसार तब्बल 3 लाख कोटी डॉलर आहे, तर इतरांच्या म्हणण्याप्रमाणे याच्याही तीनपट हा खजाना आहे. हा खजाना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या देशातील खनिज संपत्ती आहे.
युद्धांमुळे अफगाणमधील नागरिकांना कमालीच्या गरिबीत जगावं लागतंय. यामुळे हा देश गरीब देश असल्याचा भास होतो मात्र, परिस्थिती त्याच्या उलट आहे. हा देश दक्षिण आशियातील सर्वात श्रीमंत देश आहे. येथे अब्जावधींची खनिज संपत्ती आहे. ही संपत्ती मिळवण्यासाठी येथे अनेक युद्ध झालेत. म्हणूनच रशिया, अमेरिकासारखे महासत्ता देश अनेक वर्षे अफगाणिस्तानच्या भूमीत ठाण मांडून होते.