50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 3 September 2021

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 3 September 2021

| Updated on: Sep 03, 2021 | 2:59 PM

तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा, असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना दिला. 

तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा, असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना दिला. महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळेंशी बोलणं करून दिलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच त्यांच्यापाठी सरकार खंबीरपणे उभे असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांकडून अतिक्रमण विभागाच्या सुरु असलेल्या कारवाईची माहिती घेतली. जी घटना घडली तशी हिंमत पुन्हा कोणाची होता कामा नये, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांना दिले. तसेच महापौरांनी पाठवलेल्या सानुग्रह अनुदानाची फाईल निकाली काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Published on: Sep 03, 2021 02:59 PM