अशोक चव्हाण यांच्या फुटीनंतर काँग्रेसची पहिलीच बैठक, 6 आमदारांची दांडी; कोण गैरहजर, कारण काय?

अशोक चव्हाण यांच्या फुटीनंतर काँग्रेसची पहिलीच बैठक, 6 आमदारांची दांडी; कोण गैरहजर, कारण काय?

| Updated on: Feb 16, 2024 | 10:42 AM

विधानभवनातील काँग्रेस कार्यालयात काँग्रेसची पहिली बैठक होती. त्याकरता काँग्रेस आमदार जमले. यामध्ये एकूण ४४ आमदारांपैकी ३८ आमदार हजर राहिले तर ६ आमदार हे गैरहजर राहिलेत. मात्र हे सहा आमदार कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणातून गैरहजर होते

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मुंबईत काँग्रेस आमदारांची पहिलीच बैठक पार पडली. मात्र या बैठकीला काँग्रेसचे सहा आमदार अनुपस्थित होते. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांनी बैठकीला गैरहजेरी लावली. मात्र त्यांनी याबाबत आधी कळवल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. विधानभवनातील काँग्रेस कार्यालयात काँग्रेसची पहिली बैठक होती. त्याकरता काँग्रेस आमदार जमले. यामध्ये एकूण ४४ आमदारांपैकी ३८ आमदार हजर राहिले तर ६ आमदार हे गैरहजर राहिलेत. मात्र हे सहा आमदार कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणातून गैरहजर होते आणि त्याची माहिती आधीच कळवल्याचे काँग्रेसने सांगितले. या सहा आमदारांमध्ये अक्कलकुवाचे आमदार केसी पाडवी- नातेवाईकाचं लग्न, भारचे आमदार संग्राम थोपडे- कारण अद्याप अस्पष्ट, लातूरचे आमदार अमित देशमूख- परदेश दौऱ्यामुळे गैरहजर, नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे- मुलाचं लग्न, उमरेडचे आमदार राजू पारवे – कारण अद्याप अस्पष्ट… तर अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी मुलाचं लग्न असल्याचे कारण सांगत त्या गैरहजर होत्या…बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 16, 2024 10:42 AM