HMPV in Maharashtra : मुंबईकरांची चिंता वाढली; ह्युमन मेटान्यूमो नव्या व्हायरसचा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईत मेटा न्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) एक रूग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. ६ महिन्याच्या बाळाला या नव्या व्हायरसची लागण झाली असून ६ महिन्याच्या बाळाची मेटा न्यूमोव्हायरसची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
ह्युमन मेटान्यूमो या नावाता नवा व्हायरस देशभरात परसत असताना या नव्या व्हायरसने महाराष्ट्रातही एन्ट्री केल्याचे पाहायला मिळत आहे. कालपर्यंत देशात आतापर्यंत ६ बाधित रुग्ण आढळले असून अहमदाबादमध्ये १, बेंगळुरूमध्ये २, चेन्नईत २ आणि कोलकात्यात १ अशा मेटा न्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही) लागण झाली होती. यानंतर महाराष्ट्रातही नागपूर येथे मेटा न्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) दोन संशयित रूग्ण आढळून आली होती. या दोन संशयित रूग्णामध्ये एका ७ वर्षीय मुलाला आणि १३ वर्षीय मुलीला या विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर मुंबईतून या व्हायरससंदर्भात एक बातमी समोर आली आहे. मुंबईत मेटा न्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) एक रूग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. ६ महिन्याच्या बाळाला या नव्या व्हायरसची लागण झाली असून ६ महिन्याच्या बाळाची मेटा न्यूमोव्हायरसची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. १ जानेवारी रोजी या सहा महिन्याच्या बाळाला खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. दरम्यान, एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे.