Wardha Accident | सेलसुरा येथील अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अपघाताआधीच CCTV समोर

| Updated on: Jan 26, 2022 | 6:49 PM

सातही विद्यार्थी हे मेडिकलचे विद्यार्थी होते. एमबीबीएसचं शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या मृत्यूआधीचे हसरे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाले आहेत. हॉटेलात पोहोचल्यानंतर आणि निघतानाचे व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत.

वर्धा : सोमवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्याच्या (Wardha Medical Collage Student Accident) सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतक विद्यार्थी हे नेमके गेले कुठे होते, याबाबत नानाविविध तर्कवितर्क लावले जात होते. मृत सात विद्यार्थ्यापैकी एक असलेल्या पवन शक्ती या विद्यार्थ्याचा सोमवारी दिवशी वाढदिवस (Birthday) होता आणि वाढदिवस साजरा करण्याकरिता सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते. नागपूर-तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये हे गेले असून तेथील सीसीटीव्ही टीव्ही 9च्या हाती लागले आहे. या हॉटेलमधून निघाल्यानंतर सेलसुरा इथं आल्यानंतर नदीवरील पुलावरुन या विद्यार्थ्यांची कार थेट चाळीस फूट खाली कोसळली होती. या अपघातात सातही विद्यार्थ्यांचा जीव गेला होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला होता. सातही विद्यार्थी हे मेडिकलचे विद्यार्थी होते. एमबीबीएसचं शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या मृत्यूआधीचे हसरे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाले आहेत. हॉटेलात पोहोचल्यानंतर आणि निघतानाचे व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत.