पुणे प्राधिकरण निवासी प्रकल्पाचं काम 2016 पासून रखडलेलं, नागरिकांना कधी मिळणार घरं?
VIDEO | पिंपरी-चिंचवडकर ७ वर्षांपासून घरांच्या प्रतिक्षेत, 2016 पासून रखडलं पुणे प्राधिकरण निवासी प्रकल्पाचं काम, नागरिकांना कधी मिळणार घरांचा ताबा? या प्रकल्पात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वन रूम किचनच्या 366 सदनिका तर 414 सदनिका 1BHK आहे.
पुणे, १९ ऑगस्ट २०२३ | पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडी मध्ये पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 780 सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. जानेवारी 2016 पासून सुरू असलेला हा प्रकल्प तब्बल साडे सात वर्षांनी पूर्ण झाला आहे. मात्र अजून ही घरांचा ताबा नागरिकांना मिळालेला नाही. या प्रकल्पात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वन रूम किचनच्या 366 सदनिका तर 414 सदनिका 1BHK आहेत. मात्र प्रकल्प पूर्ण होऊन ही लाभार्थ्यांना घरे मिळत नसल्याने नाराजी आहे. पुणे प्राधिकरण निवासी प्रकल्पाबाबात पुणे प्राधिकरणाकडे चौकशी केली असता या सदनिकांना पुर्णत्वाचा दाखला दिलेला नाही. त्यामुळे या सदनिकांचं वाटप नागरिकांना केले जात नसल्याचे पुणे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Published on: Aug 19, 2023 06:10 PM
Latest Videos