मारूतीची ८ फूट उंच मूर्ती अन् ती पण लोण्याची! कुठं आहे प्रसिद्ध मंदिर
VIDEO | भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अवचित हनुमान दगडाचा किंवा धातूचा नसून लोण्याचा आहे, बघा कुठं आहे मंदिर
जळगाव : जळगाव तालुक्यातील रिधूर या गावी नवसाला पावणारा अवचित हनुमान मंदिर आहे, या मंदिरात आठ फूट उंचीची लोण्याची मूर्ती आहे, ही मूर्ती दगडाची किंवा धातूची नसून ती लोण्याची आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात देखील या मूर्तीवरील लोणी वितळत नाही. गुरुवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांनी अवचित हनुमान मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती, हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. हे मंदिर फार प्राचीन आहे, एका भक्ताला हनुमंताने झोपेत दृष्टांत दिला त्यानंतर रिधूर गावालगत हनुमानाचं मंदिर बांधण्यात आलं, या मंदिरात एका भाविकाने आपल्या म्हशीने दूध द्यावं म्हणून लोण्याचा नवस केला होता, तो नवस पूर्ण झाल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे या मंदिरात पशुपालक लोणी अर्पण करतात, भाविकांच्या नवसाला पावणारा अवचित हनुमान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.