रस्त्यासाठी ८० वर्षाच्या आजोबांचं भर पावसात उपोषण, काय आहे प्रशासनाकडे मागणी?

रस्त्यासाठी ८० वर्षाच्या आजोबांचं भर पावसात उपोषण, काय आहे प्रशासनाकडे मागणी?

| Updated on: Aug 15, 2023 | 6:53 PM

VIDEO | शरीर साथ देत नाही पण कुटुंबासाठी ८० वर्षाच्या आजोबांचं भर पावसात रत्नागिरीतील मिरवणे येथील ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आंदोलन, भर पावसात छत्रीचा आधार घेत भिजत ८० वर्षाच्या आजोबांचं उपोषण

रत्नागिरी, १५ ऑगस्ट २०२३ | लहानपणापासून घरात जाण्याचा वर्दळीचा रस्ता अज्ञात व्यक्तीने अडवल्यामुळे घरात जाण्याचा मार्ग काही महिन्यांपासून बंद झाला आहे. न्याय मिळावा म्हणून जयंत मोरेश्वर तांबे या ८० वर्षांच्या आजोबांनी पंचायत समितीपासून प्रशासनाच्या पायऱ्या झिजवल्यात. मात्र त्यांना न्याय काही मिळाला नाही. म्हणून ८० वर्षांच्या आजोबांनी भर पावसात छत्रीचा आधार घेत रत्नागिरीतील मिरवणे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत मधील सदस्यांनी त्यांना साधं शेड देखील उपोषणाला बसण्यासाठी दिलेलं नाही. तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ग्रामपंचायत बंद करण्याचा प्रकार मिरवणे ग्रामपंचायत येथे पहायला मिळाला. उपोषणा बसलेल्या ८० वर्षीय आजोबांशी संवाद साधला असता ते म्हणाले, उपोषण करण्यासाठी शरीर साथ देत नाही. तरीही आपल्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या घरासह आज बाजूच्या चार घरांना देखील रस्ता मिळाला पाहिजे. यासाठी या उपोषणाला बसण्याचं मुख्य कारण आहे.

Published on: Aug 15, 2023 06:52 PM