Shivajirao Sawant | पंढरपुरात 90 कर्मचारी हजर झाल्यानंतर बस स्थानकातून प्रवाशी वाहतूक सुरू
पंढरपूर आगारातून एस. टी. बस सेवा सुरु झाली आहे. आगारातील 90 कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आली. शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी पंढरपूर - स्वारगेट एसटी बसला हिरवा झेंडा दाखवला.
पंढरपूर आगारातून एस. टी. बस सेवा सुरु झाली आहे. आगारातील 90 कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आली. शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी पंढरपूर – स्वारगेट एसटी बसला हिरवा झेंडा दाखवला. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील काही कर्मचारी हजर झाल्यानंतर वाहतूक सेवा झाली सुरु झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब पंढरपूरला आल्यानंतर कामगार आणि नेतेमंडळींमध्ये बैठक झाली, त्यांच्यात चर्चा झाली, त्यानंतर आज 90 कामगार कामावर हजर झाले. त्यामुळे पंढरपूर आगारातून एस. टी. बस सेवा सुरु झाली आहे. अशी माहिती सावंत यांनी दिली. दरम्यान, सावंत यांनी यावेळी सर्व एसटी कामगारांना कामावर हजर होण्याची विनंती केली आहे.
Latest Videos