वय वर्ष अवघं 94, या वयातही आजीबाई तरतरीत, शिवनेरी किल्ला केला सर
अत्यंत कठीण अशा गिरीदुर्ग प्रकारातील शिवनेरी किल्ला सर करण्याचा ध्यास त्या आजीनी घेतला. चारही बाजूनी चढावाला कठीण असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला हा किल्ला वयाच्या ९४ वता वर्षी आजीबाईनी सर केला.
पुणे : 21 ऑगस्ट 2023 | असं म्हणतात की हौसेला, मौजेला वयाचं बंधन नसतं. कितीही वय असलं तरी हौस किंवा आपल्या आवडत्या छंदाच्या आड येत नाही. अशाच एका आजीबाईनी मनाचा निश्चय केला. या आजीबाईचे वय आहे फक्त ९४ वर्ष. कौसाबाई महादु ढोले असे या आजीचे नाव आहे. कौसाबाई यांनी कुटुंबाकडे एक इच्छा व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जुन्नर येथील जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावर जाऊन त्याचे दर्शन घ्यावे अशी ही इच्छा होती. त्यांच्या या इच्छेचा मान राखून त्यांचे कुटुंबही शिवनेरीला जाण्यास निघाले. कौसाबाई यांनी या वयातही शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला. काय म्हणतात या आजीबाई यासाठी व्हिडीओ पाहायलाच हवा.
Published on: Aug 21, 2023 11:14 PM