तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल, मृत तरुणीच्या आईची मोठी मागणी

तरूणाचा जाच संपेना… 11 वीत शिकणाऱ्या तरूणीचं टोकाचं पाऊल, मृत तरुणीच्या आईची मोठी मागणी

| Updated on: Dec 11, 2024 | 4:15 PM

अंबडमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन तसेच इयत्ता 11 वी मध्ये शिकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावं अशी मागणी मृत तरूणीच्या आईने केली आहे.

जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये काल मंगळवारी धक्कादायक घटना घडली. अंबडमध्ये इयत्ता 11 वी मध्ये शिकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीने स्वतः चे जीवन संपण्याइतकं टोकाचं पाऊल उचललं. अंबडमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन तसेच इयत्ता 11 वी मध्ये शिकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज या घटनेच्या निषेधार्थ अंबड शहरात विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने मृत तरुणीला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात स्वतः मृत तरुणीची आई आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. अंबड शहरातल्या चक्री चौकातून हा मोर्चा सुरू झाला आणि तहसील कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा आणि इतर सह आरोपीला तात्काळ अटक करावी, अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणात संघटीत गुन्हेगारी असून आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावं अशी मागणी मृत तरूणीच्या आईने केली आहे. यावेळी मृत तरुणीच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 11, 2024 04:15 PM