मंत्रालयातील ‘त्या’ धमकीच्या कॉल प्रकरणात अपडेट, पोलिसांकडून एका इसमाला अटक; कोण आहे ‘ती’ व्यक्ती?
VIDEO | मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर धमकीचा फोन करणारा इसम कांदिवली पोलिसाच्या जाळ्यात, कोण आहे धमकी देणारा व्यक्ती?
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कदायक माहिती समोर आली होती. फोन करणाऱ्याने एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाई करण्याची धमकी दिली. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँड लाईनवर काल रात्री 10 वाजता हा फोन आला होता. या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र या धमकी फोन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्रालयामध्ये फोन करून धमकी देणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. धमकी देणाऱ्या या इसमाचं नाव प्रकाश खेमानी असं असून त्याचे वय ६१ वर्ष असे आहे. या व्यक्तीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
Published on: Aug 08, 2023 11:15 AM
Latest Videos