ठाण्यातील लुईसवाडी परिसरात मोठं झाड कोसळलं
ठाण्यातील लुईसवाडी परिसरात मोठं झाड कोसळलं आहे आणि हे झाडं पडल्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ठाण्यातील लुईसवाडी परिसरात मोठं झाड कोसळलं आहे आणि हे झाडं पडल्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कालपासून कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली. मुंबईत पाच ठिकाणी घरांची पडझड झाली. यापैकी शहरात तीन, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एका घराची पडझड झाली. 14 ठिकाणी शॉर्टसर्किट झाले आणि 14 ठिकाणी झाडे, फांद्या कोसळल्या. सोमवारी संध्याकाळी पावसाची तीव्रता आणखी वाढली. रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावल्याने नोकरदारांना घर गाठण्यासाठी कसरत करावी लागली.
Latest Videos