‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, 'त्या' फेक कॉलनंतर नागपूर पोलीस सतर्क अन् ...

‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, ‘त्या’ फेक कॉलनंतर नागपूर पोलीस सतर्क अन् …

| Updated on: Mar 28, 2023 | 7:43 PM

VIDEO | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर थरार, नागपूर पोलीस सतर्क; काय घडला प्रकार?

नागपूर : महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमचा फोन रात्री दोन वाजता वाजला आणि ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या फेक कॉलनंतर रात्रीतून नागपूर पोलिसांच्या बॉम्ब पथकाने देवेंद्र फडणवीस यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. तपासानंतर तिथं कोणताही बॉम्ब आढळून आला नाही. तो फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं. अखेर नागपूर पोलिसांनी हा खोटी माहिती देणारा फोन कुणी केला, याचा तपास केला आणि त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, नागपूर कंट्रोल रुमाल फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता आपण तणावाखाली होतो. कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी असा फोन केल्याचं या व्यक्तीने सांगितलं.

Published on: Mar 28, 2023 07:43 PM