मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, बस ट्रॅक्टरला आदळली अन् थेट...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, बस ट्रॅक्टरला आदळली अन् थेट…

| Updated on: Jul 16, 2024 | 12:11 PM

mumbai pune expressway bus accident डोंबिवलीकडून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. खासगी बसच्या या भीषण अपघातामध्ये पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. खासगी बसच्या या भीषण अपघातामध्ये पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर या बसमध्ये 54 प्रवासी होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल जवळ ही खासगी बस एका ट्रॅक्टरला आदळली आणि थेट दरीत कोसळली. रात्री एक वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. अपघातात काही जण जखमी झाले असून त्या सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Published on: Jul 16, 2024 12:10 PM