अजित पवार गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार अन्...

अजित पवार गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार अन्…

| Updated on: Sep 13, 2024 | 5:17 PM

अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या सुरक्षेतेसाठी विनोद नढे यांनी हे पिस्तूल घेतले आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नढे आणि विनोद नढे या दोघांना अटक केली आहे.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे शहरात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते. ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील विनोद नढे आणि सचिन नढे यांना अटक करण्यात आली आहे. विनोद नढेच्या बंदुकीतून सचिन नढेने गोळीबार केल्याने दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विनोद नढे हे अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आहेत. विनोद नढे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे हे दोघे राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते. त्याच दरम्यान विनोद नढे यांना त्यांच्या चुलत्याचा फोन आला. कशाला फिरतो काळजी घेत जा? असा सल्ला चुलत्याने दिला. त्यावर विनोद नढे यांनी सांगितले की, काळजी करु नको, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे. विनोद नढे याचा संवाद ऐकून चुलत भाऊ सचिन नढे याने गंमतीत म्हटले, खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे का? मग त्यानंतर विनोद नढे याने पिस्तूल काढून दाखवली. त्यानंतर सचिन नढे याने पिस्तूल लोड करून थेट गोळीबार केला.

Published on: Sep 13, 2024 05:17 PM