मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?
VIDEO | ठाकरे गटाला मोठा झटका, थेट मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?
मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आली आहे. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅगज खरेदीतही घोटाळा झाला होता. बॉडी बॅग खरेदीबाबत यापूर्वी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती. हे कंत्राट देताना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच आज आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.