मनसेच्या मोठ्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अविनाश जाधव यांच्या विरोधात लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका सराफाच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडून अविनाश जाधव यांनी ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच मनसेच्या मोठ्या नेत्यानं तब्बल ५ कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. इतकंच नाहीतर त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. हा नेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव यांच्या विरोधात लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका सराफाच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडून अविनाश जाधव यांनी ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव हे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. मुंबईत एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यासोबत ठक्कर नावाचा एक इसमही या प्रकरणात आरोपी आहे. खंडणी मागणे, कट रचणे आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळतेय.