Ketaki Chitale | केतकी चितळेवर शाईफेक करून धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हा दाखल-TV9

Ketaki Chitale | केतकी चितळेवर शाईफेक करून धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हा दाखल-TV9

| Updated on: May 16, 2022 | 3:38 PM

केतकी चितळेवर धक्कबुक्की करून शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली पोलीस (Police) ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर महिला कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली होती. केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर आणण्यात आले तेव्हा हा प्रकार घडला. तिला पोलीस गाडीत बसवत असताना अचानक काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्या अंगावर शाईफेक केली होती. तसेच केतकी चितळे हाय हायच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे शाईफेक झाल्यानंतर केतकी चितळे हसत होती. केतकी चितळेवर धक्कबुक्की करून शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली पोलीस (Police) ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेची कारवाई होत असताना तिच्या शाईफेककरण्यात आली.

Published on: May 16, 2022 03:28 PM