Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालीचरण महराज पुन्हा अडचणीत, पाहा आता काय आहे प्रकरण?

कालीचरण महराज पुन्हा अडचणीत, पाहा आता काय आहे प्रकरण?

| Updated on: May 16, 2023 | 10:31 AM

VIDEO | कालीचरण महाराज यांच्या अडचणी वाढणार? 'ते' प्रकरण भोवलं, कुठं दाखल झाला आणखी एक गुन्हा

संभाजीनगर : सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या कालीचरण महाराज आता अडचणीत सापडले आहेत. कालीचरण महाराज यांच्या आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या एका हिंदू जनजागरण सभेत बोलताना कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन या तक्रार दिल्याने रविवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांनी या सभेत भडकावू भाषण केले, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. यासह इतर आयोजकांच्या नियम आणि अटींचे पालन त्यांनी केले नसल्याने कालीचरण महाराज यांच्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: May 16, 2023 10:31 AM