Special Report | भाजपची मोर्चेबांधणी, 'बारामती'ला आव्हान!

Special Report | भाजपची मोर्चेबांधणी, ‘बारामती’ला आव्हान!

| Updated on: Sep 04, 2022 | 10:08 PM

सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्यासहीत बारामतीत भाजपचे अनेक केंद्रीय नेते दौरे करणार आहेत. म्हणून यंदा सुप्रिया सुळेंना दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल असा दावा भाजपच्या राम शिंदे करतायत.

मुंबई : भाजपनं महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा जागांपैकी 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय आणि सध्या भाजप नेते सर्वाधिक ताकद लावतायत. ते म्हणजे बारामती लोकसभेवर. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्यासहीत बारामतीत भाजपचे अनेक केंद्रीय नेते दौरे करणार आहेत. म्हणून यंदा सुप्रिया सुळेंना दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल असा दावा भाजपच्या राम शिंदे करतायत. जेव्हा शिवसेना भाजपची युती होती. तेव्हापासून बारामती लोकसभेत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा संघर्ष व्हायचा. याआधी बारामती लोकसभेची लढत फक्त औपचारिकच व्हायची. पण खासकरुन 2014 नंतर भाजपनं बारामतीवर विशेष लक्ष देणं सुरु केलं. 2009 च्या लोकसभेत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे(Supriya Sule) तर भाजपकडून कांता नलावडेंमध्ये सामना झाला.

तेव्हा सुप्रिया सुळेंनना ४ लाख ८७ हजार ८२७ मतं पडली. भाजपच्या कांता नलावडेंना १ लाख ५० हजार ९९६ मतं. सुप्रिया सुळे ३ लाख ३६ हजार ८३१ मतांनी जिंकल्या. पण हा लीड कमी झाला 2014 च्या लोकसभेत. 2014 ला सुप्रिया सुळेंविरोधात रासपचे महादेव जानकरांनी निवडणूक लढवली. त्यावेळी सुप्रिया सुळेंना ५ लाख २१ हजार ५६२ मतं मिळाली. तर, महादेव जानकरांना ४ लाख ५१ हजार ८४३. 2009 च्या तुलनेत जवळपास साडे ३ लाखांचं लीड फक्त 69 हजार 719 वर आलं. पण 2019 च्या लोकसभेत सुप्रिया सुळेंनी पुन्हा जास्तीचं मताधिक्य मिळवत विजय मिळवला. 2019 मध्ये सुप्रिया सुळेंविरोधात भाजपनं कांचन कुल यांना उमेदवारी दिली. सुप्रिया सुळेंना 6 लाख 86 हजार 714 मतं मिळाली. तर भाजपच्या कांचन कुल यांना 5 लाख 30 हजार 940 मतं. १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी सुप्रिया सुळे जिंकल्या
म्हणजे 2009 च्या तुलनेत सुप्रिया सुळे 86 हजार जास्तीचा लीड मिळाला.

लोकसभा निवडणुकीला दोन वर्षे अवधी आहे. मात्र भाजपनं आत्तपासून लोकसभांची तयारी सुरु केलीय. त्यामुळं आगामी निवडणुकीत भाजपचं मिशन फत्ते होवून सुप्रिया सुळेंना दुसरा मतदारसंघ शोधावा लागतो, की मग बारामतीकर पुन्हा सुळेंनाच विजयी करतात. हे येणारा काळच सांगेल.

Published on: Sep 04, 2022 10:08 PM