Wrestlers Protest | कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाला वेगळं वळण, काय घेतली नवी भूमिका
VIDEO | कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात नवा ट्विस्ट, एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी भूमिका बदलली
नवीदिल्ली : कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाला वेगळं वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी भूमिका बदलली आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेनं तक्रार केली आहे, असे म्हणत एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी आपली कबुली दिली आहे. या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दिलेल्या कबुलीनंतर आता कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरण वेगळ्या दिशेकडे जाण्याची शक्यता आहे. अशातच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग १५ जूननंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांवरून न्याय मिळावा या मागणीसाठी कुस्तीपटूंनी त्यांचा सुरू ठेवलाय. या संघर्षानं सर्वांच्या नजरा वळवल्या असताना गेल्या ४५ दिवसांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांच्या कबुलीनं वेगळं वळण मिळालंय.