अजून किती निर्भया? बलात्कारानंतर निर्घृण हत्या; ममता सरकारची दिरंगाई, भाजपचा निशाणा

अजून किती निर्भया? बलात्कारानंतर निर्घृण हत्या; ममता सरकारची दिरंगाई, भाजपचा निशाणा

| Updated on: Aug 16, 2024 | 11:40 AM

सरकारी रूग्णालयात एका तरूणीवर बलात्कार आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या होते. याप्रकरणावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर दिरंगाईचा आरोप होतोय. याप्रकरणानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सरकारी रूग्णालयात सारा प्रकार घडून देखील तपासाला दिरंगाई का झाली? स्थानिक डॉक्टर आक्रमक

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर पश्चिम बंगालच्या घटनेनं संपूर्ण देशातून संताप व्यक्त होतोय. एका प्रशिक्षणार्थी तरूणीवर बलात्कार करून सैतानालाही लाजवेल अशा प्रकारे तिची हत्या केली गेली. सरकारी रूग्णालयात तिची मृतदेह आढळल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर तरूणीचे डोळे, तोंड आणि गुप्तांगांमध्ये रक्तस्त्राव झालेला होता असे समोर आले. इतकंच नाहीतर पाठ, मान आणि ओठांवरही जखमा आढळून आल्यात. कोलकत्ता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एसआयटी स्थानप केली. संजय रॉय या व्यक्तीसह नऊ जणांना अटकही करण्यात आली आहे. मात्र रिपोर्टनुसार, तरूणीवर गँग रेप झाल्याची प्रथम दर्शनी दिसतंय. कोलकत्याच्या सरकारी रूग्णालयात सारा प्रकार घडून देखील तपासाला दिरंगाई का झाली? यावरून स्थानिक डॉक्टरांनी पोलिसांवर पुरावे मिटवण्याचा आरोप केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 16, 2024 11:40 AM