कुणी झाशीची राणी तर कुणी सावित्रीबाई; एकल महिलांचा 'फॅशन का जलवा'

कुणी झाशीची राणी तर कुणी सावित्रीबाई; एकल महिलांचा ‘फॅशन का जलवा’

| Updated on: Mar 12, 2023 | 6:30 PM

VIDEO | एकल समाजातील कर्तबगार महिलांची वेशभुषा साकारत महिलांनी केलेला रँम्पवॉक आकर्षणाचा ठरला केंद्रबिंदू

अहमदनगर : कोपरगावात सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान आणि स्टारडम इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने एकल महिलांसाठी फँशन शोचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील कर्तबगार महिलांची वेशभुषा साकारत महिलांनी केलेला रँम्पवॉक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या स्पर्धेत एकल महिलांनी सामाजिक क्षेत्रात कतृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांची वेषभुषा साकारत रँम्पवॉक केला. या स्पर्धेत अकोले येथील सुरेखा पुंजा मंडलिक या प्रथम विजेत्या महिल्या ठरल्या आहेत. तर कोपरगाव येथील रश्मी शिवनारायण शर्मा द्वितीय आणि बारामती येथील अश्विनी तावरे तृतीय क्रमांक विजेत्या ठरल्या आहेत. बघा अहमदनगरमधील एकल महिलांचा ‘फॅशन का जलवा’…

Published on: Mar 12, 2023 06:30 PM