मराठा-ओबीसी वादावरून सरकारची गोची? भाजप आमदारानं जरांगेंसमोर दिली कबुली, काय झाला संवाद बघा?
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं का? यावर विरोधकांसह सत्ताधारी भाजपही बोलत नाही, असं विधानही त्यांनी केलं. त्यावर सत्ताधारी निर्णय घेऊन विरोधकांना उघडं का करत नाही असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी उत्तर दिलं नाही.
मराठा आरक्षण वादात सरकारचीच कोंडी झाल्याची कबुली भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं का? यावर विरोधकांसह सत्ताधारी भाजपही बोलत नाही, असं विधानही त्यांनी केलं. त्यावर सत्ताधारी निर्णय घेऊन विरोधकांना उघडं का करत नाही असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी उत्तर दिलं नाही. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा एक गट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेला होता. यावेळी भाजपचे तुळजापूरचे राणा जगजितसिंह, बदनापूरचे नारायण कुचे, भाजप पुरस्कृत बार्शीचे राजेंद्र राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नांदेडमधील बालाजी कल्याणकर या आमदारांनी मनोज जरांगेची भेट घेतली. यावेळी आरक्षणावरून सरकारची गोची झाल्याचं विधान भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं आहे. बघा नेमका काय झाला मनोज जरांगे पाटील आणि या आमदारांमध्ये संवाद?