मुसळधार पावसामुळे खुललं पानवल धबधब्याचं मनमोहक रूप; धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी
आताही कोकणातील या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी जाणारे अनेक लोक इकडे सध्या रत्नागिरीला जात आहेत. तर वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती कोकणाला मिळत आहे.
रत्नागिरी, 23 जुलै 2023 | पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकणात पावसाची जोर कायम आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या येथील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर येथील धबधबे देखील आता प्रवाहित झाले आहेत. ज्यामुळे पर्यटकांची पावले या धबधब्यांच्याकडे वळत आहेत. आताही कोकणातील या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे वर्षा सहलीसाठी जाणारे अनेक लोक इकडे सध्या रत्नागिरीला जात आहेत. तर वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती कोकणाला मिळत आहे. आज रविवारी असून विकेंड असल्यानेही पर्यटकांची पावले कोकणातील ठिकठिकाणी असणाऱ्या नयनरम्य धबधब्यांकडे वळली आहेत. सध्या पावसामुळे येथील धबधब्यांचं मनमोहक रूप खुलंले असून पानवल धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.