Odisha Train Accident | ओडिशामध्ये 3 रेल्वे गाड्यांची टक्कर अन् भीषण अपघात

Odisha Train Accident | ओडिशामध्ये 3 रेल्वे गाड्यांची टक्कर अन् भीषण अपघात

| Updated on: Jun 03, 2023 | 6:39 AM

VIDEO | तीन रेल्वे गाड्यांची टक्कर, उडाला मोठा हाहाकार; कुठं घडली घटना

बालासोर : चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. तब्बल तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या त्यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. सुरुवातीला कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाल्याने काल हा भीषणअपघात झाला. बालासोरमध्ये दोन गाड्यांची टक्कर नाही तर तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात 200 हून अधिक जणांच्या मृत्यूची माहिती समोर येते. बचाव पथकाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. शेकडो जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी काम करत आहेत. देशभरातून वेगवेगळी पथक ओडिशाला मदतीसाठी रवाना झाले आहेत. दुर्घटना खूप मोठी आहे. एका गाडीत 1600 प्रवाशी होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, भारताच्या इतिहासातील ही सर्वात भयानक रेल्वे दुर्घटना आहे.

Published on: Jun 03, 2023 06:33 AM