नवी झेप घेण्यासाठी सज्ज…आढळराव पाटील अजित पवार गटात, FB पेजवर राष्ट्रवादीचा उल्लेख
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवर बदल.... पक्ष प्रवेशाला काही तास शिल्लक असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवर बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. या बदलामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पक्ष प्रवेशाला काही तास शिल्लक असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर राष्ट्रवादी काँग्रेस असा उल्लेख केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यापूर्वीच त्यांनी आपल्या फेसबुकपेजवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ्याचं चिन्ह टाकल्याचे पाहायला मिळत असून तसा उल्लेख केला आहे. तर जनता हीच माझी ताकद, काम हीच माझी ओळख, असं ब्रीद वाक्यही त्यांनी त्यावर नमूद केले आहे तर महायुती सरकारच्या नेतृत्वासह, विकासाचे नवे शिखर गाठण्याचा हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. महायुतीच्या सशक्त मार्गदर्शनाखाली, देश उन्नतीची नवी झेप घेण्या साठीसज्ज आहे. या प्रवासात माझी जनता माझ्या पाठीशी खंबीर पणे उभी राहील अशी मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.