अवघ्या एका महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्... देवगिरी एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना

अवघ्या एका महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्… देवगिरी एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना

| Updated on: Sep 09, 2024 | 3:10 PM

मुंबई देवगिरी एक्सप्रेसच्या शौचालयात अवघ्या दीड वर्षाच्या बाळाला टाकून या बाळाचे अज्ञात पालक पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. एक्सप्रेसच्या शौचालयात हे बाळ कमोडच्या शेजारी एका ओढणीवर झोपलेलं दिसलं. यानंतर सतत त्या बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याने एक्सप्रेसमधील प्रवाशांनी जाऊन पाहिले अन् एक्स्प्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली

अवघ्या एका महिन्याच्या बाळाला देवगिरी एक्स्प्रेसच्या शौचालयात ठेवून पालक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये शौचालयात एक-दीड महिन्याचं बाळ आढळल्याने एक्सप्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर शौचालयातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज सतत येत होता. शौचालयातून आवाज येत असल्याने एक्सप्रेसमधील प्रवाशांनी पाहिले असता त्यांना शौचालयात बाळ झोपल्याचे दिसले. यानंतर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला असता मनमाड रेल्वे स्थानकावर अवघ्या एक दीड महिन्याच्या बाळाला उतरविण्यात आले. पोलिसांनी या बाळाला नाशिक येथे बालसुधार गृहात ठेवले आहे. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस या विकृतीचा कळस गाठणाऱ्या पालकांचा शोध घेत आहेत.

Published on: Sep 09, 2024 03:10 PM