लसूण चोरणं पडलं महागात, थेट बेतलं जीवावर; कुठं घडला धक्कादायक प्रकार?
लसूण चोरीच्या संशयावरून बोरिवलीत धक्कादायक प्रकार घडला. आरोपानुसार फक्त ६ हजार ४०० रूपयांचे २० किलो लसूण चोरले म्हणून त्या व्यक्तीचा थेट जीवचं घेतला. आधी बेदम मारहाण केली. मात्र उपचारादरम्यान पंकज मंडल नावाच्या व्यक्तीचा जीवच गेला.
मुंबई, १७ डिसेंबर २०२३ : दुकानात काम करणाऱ्या एक व्यक्तीने ६ हजार ४०० रूपयांचे लसूण चोरले, म्हणून दुकान मालकानं त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील बोरिवली या ठिकाणी घडली. लसूण चोरीच्या संशयावरून बोरिवलीत धक्कादायक प्रकार घडला. आरोपानुसार फक्त ६ हजार ४०० रूपयांचे २० किलो लसूण चोरले म्हणून त्या व्यक्तीचा थेट जीवचं घेतला. आधी बेदम मारहाण केली. मात्र उपचारादरम्यान पंकज मंडल नावाच्या व्यक्तीचा जीवच गेला. या प्रकरणी व्यापारी घनश्याम आग्रीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या ७ महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात मृत्य व्यक्ती मुंबईत आली होती. त्याला कांदे बटाट्यांच्या दुकानात काम मिळालं. मात्र गेल्या काही दिवसांपासूनच त्या मृत व्यक्तीलर चोरीचा संशय होता. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट