AIMIM Leader Waris Pathan | AIMIM नेते वारीस पठाण यांच्या तोंडाला काळं फासलं?
एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केलाय. तसंच काँग्रेस घाबरली आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे (AIMIM) माजी आमदार आणि नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. वारीस पठाण हे सध्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका तरुणानं वारीस पठाण यांना काळं फासल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत वारीस पठाण यांनाच विचारलं असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपण एका दर्ग्यात गेलो होतो. तिथे चादर पेश केली. तिथे काही तरुणांनी आपलं हार घालून स्वागत गेलं. तसंच एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केलाय. तसंच काँग्रेस घाबरली आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.