Buldana | बुलडाण्यात विहिरीत आढळलेला अजगर, सर्पमित्र वनिता बोराडे यांनी काढला बाहेर

Buldana | बुलडाण्यात विहिरीत आढळलेला अजगर, सर्पमित्र वनिता बोराडे यांनी काढला बाहेर

| Updated on: Sep 21, 2021 | 12:43 PM

मेहकर तालुक्यातील वरवंड येथील शेतकरी उत्तम पायघन यांच्‍या शेतातील विहिरीतून १० फुटी अजगराला सर्पमित्र वनिता बाेराडे यांनी पकडलंय..

मेहकर तालुक्यातील वरवंड येथील शेतकरी उत्तम पायघन यांच्‍या शेतातील विहिरीतून १० फुटी अजगराला सर्पमित्र वनिता बाेराडे यांनी पकडलंय.. तब्‍बल १५ किलो वजनाचा हा अजगर ५५ फूट खोल विहीर असताना आणि त्‍यात ४५ फुटांपर्यंत पानी असतानाही सर्पमित्र वनिता बोराडे यांनी धाडसाने अजगराला पकडून आपले काम फत्ते केलय.

शेतकरी पायघन यांच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी शेजारील शेतकरी गेले होते, यावेळी त्यांना विहिरीतील पाण्यात भलामोठ्ठा अजगर तरंगत असल्याचे दिसलेय… त्‍यांनी तातडीने पायघन यांना घटनेची माहिती देऊन तात्काळ सर्पमित्र वनिता बोराडे यांनाही कळवलेय… ही माहिती गावात पसरताच अजगर पाहण्यासाठी विहिरीवर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.. सर्पमित्र वनिता बोराडे यांनी तात्काळ शेतात दाखल होऊन आपल्या धाडसाने विहिरीत उतरल्या, आणि कोणत्याही उपकरणांची मदत न घेता सरळ हाताने या १० फुटी अजगराला हळूवारपणे पकडलेय.. आणि त्याला वनविभागाचे मदतीने जंगलात सोडणार असल्याचे सांगितले.