विंटेज रोल्स रॉयल मधून शिवेंद्रराजे यांची भन्नाट राईड
VIDEO | शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात घेतली व्हिंटेज रोल्स रॉईसची राईड, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
सातारा : साताऱ्यातील बँड व्यवसायिक अशोक जाधव यांना जुन्या गाड्या घेण्याचा छंद आहे. गेल्या पाच वर्षापासून त्यांना रोल्स रॉयल ही विंटेज कार घ्यायची होती, त्यासाठी त्यांनी गेली पाच वर्षे इंटरनेटच्या आधारे खूप शोध घेतला अखेर मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे दोन गाड्या त्यांना पसंत पडल्या. त्यातली एक गाडी 1945 तर दुसरी 1958 सलातली आहे. त्या गाड्यांची डागडुजी करून आता त्यात दोन विंटेज गाड्या ह्या साताऱ्यात दाखल झाले आहेत. या गाड्यांच्या पूजनाच्या प्रसंगी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना बोलवण्यात आले होते. यावेळी पूजन झाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनाही ही गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही, अखेर विंटेज रोल्स रॉयल मधून शिवेंद्रराजेंनी एक राईड मारली.
Published on: Mar 24, 2023 04:34 PM
Latest Videos