Maharashtra Rain : सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांनी काय घेतला मोठा निर्णय?
VIDEO | महाराष्ट्रात पावसाचं थैमान अन् राज्यातील प्रशासन अलर्ट मोडवर, सातारा जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचं मोठं पाऊल
सातारा : सातारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस पडत आहे. महाबळेश्वर नवजामध्ये एकाच दिवशी 340 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी करून ठेवली आहे. सातारा जिल्ह्यात बुधवार आणि गुरूवारी रेड अलर्ट असल्यामुळे पुढील सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागासाठी एक NDRF चे पथक कराड येथे दाखल झाले आहेत. धोकादायक दरड प्रवण क्षेत्रातील 41 गावातील 500 कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे. तर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर बांधकाम विभागाकडून यंत्रणा तयार ठेवली असून ज्या ठिकाणी दरड पडेल त्या ठिकाणी दोन तासात ती दरड हटविले जाईल अशा उपायोजना केल्या आहेत.