AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर रस्त्यावर माळशेज घाटात पसरली धुक्याची दाट चादर

नगर रस्त्यावर माळशेज घाटात पसरली धुक्याची दाट चादर

| Updated on: Jul 24, 2022 | 10:46 AM

या परिसरात पावसाचा जोर एवढा आहे की, समोर काही दिसत नाहीत अशी परिस्थिती सध्या माळशेज घाटात पहायला मिळत आहे.

मुरबाड – नगर रस्त्यावर माळशेज घाटात पसरली धुक्याची दाट चादर, वाहन चालकांना दिवसा आपल्या वाहनांची लाईट लाऊन वाहन चालवावे लागत आहे. माळशेज घाटात संतधार पाऊस पडत असून सर्वत्र दात धुके पसरले असून पूर्ण रस्ता हा धुक्याने हरवला आहे. त्यामुळे वाहने सावकाश व जपून चलवावित अशे सांगितले जात आहे. नगर महामार्गावरील माळशेज घाट निसर्गरम्य वातावरणाने फुलला असून संपूर्ण राज्यभरातून पर्यटक येथे दरवर्षी आनंद लुटण्यासाठी येत असतात.पर्यटन बंदी उठल्यानंतर पहिलाच विकेंड असल्याने येथील धूरनळीचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. डोंगराच्या धूरनळी धबधब्याची पर्यटकांना कमालीची भुरळ पडत आहे.त्यात चिंब भिजण्यासाठी व या मनोहारी नयनरम्य दृश्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत असतात. घाटमाथ्यावर माळशेज घाटात गेल्या काही दिवसांपासून जोरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण माळशेज घाट धुक्यात हरवून गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या परिसरात पावसाचा जोर एवढा आहे की, समोर काही दिसत नाहीत अशी परिस्थिती सध्या माळशेज घाटात पहायला मिळत आहे.

Published on: Jul 24, 2022 10:46 AM