Dombivli Building Collapse | डोंबिवली 3 मजली इमारत कोसळली अन्…
VIDEO | डोंबिवलीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, डोंबिवलीमध्ये कुठे घडली नेमकी घटना आणि किती जण ढिगाऱ्याखाली अडकले?
डोंबिवली, १५ सप्टेंबर २०२३ | डोंबिवलीमधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची तीन मजली इमारत कोसळली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आदिनारायण सोसायची ही इमारत जुनी असल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना कालच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले होते आणि सुदैवाने आज ही इमारत कोसळण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. इमारत कोसळण्याच्या या घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाचे जवान आणि महापालिका प्रशासन, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
Published on: Sep 15, 2023 06:54 PM
Latest Videos