अन् तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
VIDEO | तीन मजली इमारत कोसळली, 60 ते 70 लोक दबल्याची भीती; अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू, कुठं घडली दुर्देवी घटना?
ठाणे : भिवंडीच्या वालपाडा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कोणतीही अद्याप जीवीत हानी झाली नसली तरी या इमारतीखाली 60 ते 70 लोक इमारतीच्या ढिगाऱ्या खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वालपाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली आहे. इमारतीचा ढिगारा बाजूला केला जात आहे आणि त्याखालून दबलेल्या लोकांना काढलं जात आहे. तर दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही इमारत जुनी असल्याची माहिती आहे. ही घटना दुपारी १२ वाजता घडली. वलपाडा येथे वर्धमान नावाची इमारत आहे. ही तळमजला अधिक तीन मजली इमारत ही आहे. या इमारतीच्या खाली गोडाऊन होतं. गोडाऊनच्या वरील इमारतीत तिन्ही मजल्यावर लोकं राहत होते. या गोडाऊनमध्ये साधारण 30 ते 35 लोक काम करत असताना दुपारी अचानक इमारती कोसळली आणि हे सर्व कामगार इमारतीखाली गाडले गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.