Special Report | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी? ‘ही’ 4 नावं फिक्स तर 3 आमदार गॅसवर?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्तारात हे चार नावं निश्चित, कधी होणार विस्तार? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होणाची शक्यता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत चार नावं निश्चित केली आहेत. तर अजून कोणाची वर्णी लागू शकते याची चर्चा सर्वत्र सुरूये. तर या मंत्रिमंडळात एकूण १४ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे ७ मंत्री आणि भाजपकडून ७ मंत्री शपथ घेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमूलकर, बच्चू कडू ही चार नावं निश्चित झाली आहेत. आमदार अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमूलकर आणि बच्चू कडू यांची ४ नावं निश्चित झाले असली तर इच्छुक असलेल्या तीन जणांची नाव अद्याप फिक्स झालेली नाहीत. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, योगेश कदन यांच्याही नावावर अंतिम मोहोर उटमटलेली नाही. सध्या २० मंत्री राज्याचा कारभार चालवताय. नुकताच सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर निकाल लागल्याने सरकारला कोणताच धोका नसल्याचं स्पष्ट झालंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट