मुंबईतील 'त्या' प्रकारानंतर अन्न-औषध प्रशासन अॅक्शनमोडमध्ये, ६८ हॉटेल्सना FDA कडून थेट नोटीस

मुंबईतील ‘त्या’ प्रकारानंतर अन्न-औषध प्रशासन अॅक्शनमोडमध्ये, ६८ हॉटेल्सना FDA कडून थेट नोटीस

| Updated on: Sep 13, 2023 | 2:40 PM

VIDEO | मुंबईच्या वांद्रेमधील एका प्रसिद्धी हॉटेलमध्ये चिकन डिशमध्ये उंदीर सापडल्याच्या प्रकारानंतर एफडीए ऍक्शन मोडमध्ये, एफडीएकडून मुंबईतील त्या 68 हॉटेल्सना बजावली कारणे दाखला नोटीस

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | मुंबईच्या वांद्रेमधील एका प्रसिद्धी हॉटेलमध्ये चिकन डिशमध्ये उंदीर आढळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, चिकन डिशमध्ये उंदीर सापडल्याच्या प्रकारानंतर एफडीए ऍक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. एफडीएकडून मुंबई शहरात विशेष ड्राईव्ह राबवण्यात आलं आहे. एफडीएकडून करण्यात आलेल्या या विशेष ड्राईव्हमध्ये मुंबईमधील एकूण 68 हॉटेल्सने नियमावलीचं उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरणी एफडीएकडून त्या 68 हॉटेल्सना नोटीस देण्यात आली आहे. माहीममधील मुंबई दरबार हे हॉटेल बंद करण्याच्या सूचना एफडीए यावेळी दिल्या आहेत. फुड लायसन्सविना हॉटेल चालवत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतल्या 68 हॉटेल्समध्ये नियमावलीच उल्लंघन होत असल्याचं समोर आल्यानंतर एफडीएकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. मुंबईतल्या आणखी काही हॉटेल्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे एफडीएकडून सांगण्यात येत आहे.

Published on: Sep 13, 2023 02:38 PM