प्राचीन हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिर ४५ वर्षाहून अधिक काळ पाण्यात, बघा ड्रोनची दृश्य
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील भीमानदीच्या पात्रात १९७५ साली जलसमाधी मिळालेले अति प्राचीन हेमाड पंथी पळसनाथाचे मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खलावल्याने आले समोर, या मंदिराचा काळ जरी निश्चित नसला तरी याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायात "पलाशतीर्थ" म्हणून आढळून येते .या हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात केलेले आहे
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील भीमानदीच्या पात्रात १९७५ साली जलसमाधी मिळालेले अति प्राचीन हेमाड पंथी पळसनाथाचे मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खलावल्याने उघडे झाले आहे, हे मंदिर ४५ वर्षे हून अधिक काळ पाण्यात लाटांशी झुंज देत आहे. सध्या काही प्रमाणात त्याची पडझड झालीय. या मंदिराचा काळ जरी निश्चित नसला तरी याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायात “पलाशतीर्थ” म्हणून आढळून येते .या हेमाडपंथी पळसनाथाचे मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात केले असून शिखरची सप्तभूमी पद्धतीची बांधणी असून शिखरासाठी पक्क्या विटा चुना इ. वापर करून बांधले आहे. मंदिरा समोर भव्य सभा मंडप गाभारा, उंच शिखर, लाब लाब शिळा विविध मदनिका, अलासकन्या, सूरसुंदरी, जलामोहिनी, नागकन्या मुर्त्या चौकोनी खांब,वर्तुलाकुर्ती पात्रे,त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा,बेल अशा पंच शाखा सुस्थितीत दिसून येतात अशा शिल्प मुर्त्यांमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर पार्वती, तीन विरगळी तसेच रामायण, महाभारातीलाही इंद्र दरबारी असणाऱ्या देवी देवतांच्या शिल्पकला त्या काळी केलेली अफलातून अप्रतिम कोरीव काम करून त्याची केलेली जडण घडण खरीच कौतुकास्पद आहे. त्याचीच हे ड्रोनच्या माध्यमातून टीपलेली दृश्य..

'खोक्या'चा गेम ओव्हर, सतीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर

'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल

सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?

आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
