उद्धव ठाकरेंच्या कानठळ्या बसतील, एवढ्या फटाक्यांच्या माळा लावा, भरत गोगावले यांचं फर्मान; व्हिडीओ व्हायरल

उद्धव ठाकरेंच्या कानठळ्या बसतील, एवढ्या फटाक्यांच्या माळा लावा, भरत गोगावले यांचं फर्मान; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Feb 20, 2024 | 6:24 PM

विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये भरत गोगावले फोनवर कुणाशीतरी संवाद साधताना दिसताय.

मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले. विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये भरत गोगावले फोनवर कुणाशीतरी संवाद साधताना दिसताय. उद्धव ठाकरे यांच्या कानठळ्या बसतील एवढ्या आवाजाचे फटाक्यांच्या माळा लावा, असे भरत गोगावले फोनवरून सांगताय. तर खरे मराठे असाल तर पेढे वाटायसाठी एकत्र याल असं फोनवर बोलताना भरत गोगावले यांचा व्हिडीओ कैद झाला आहे. इतकंच नाहीतर मराठ्यांना १० टक्के आरक्षण दिल्याचा सरकारच्या निर्णयाचं स्वागत करा, आमदारांना सरकारकडून सूचना दिल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Feb 20, 2024 06:24 PM